अनुदानासाठी दूध संकलनाची माहिती पोर्टलवर भरण्यासाठी राज्य सरकारने १५ एप्रिलपर्यंतची मुदतवाढ दिली आहे. मात्र, टॅगिंग, पशुपालक, जनावरांची माहिती भरण्यास अपुऱ्या कालावधीमुळे अनेक लाभार्थी अनुदानापासून वंचित राहण्याची शक्यता असल्याने त्यांच्यातून नाराजी व्यक्त केली जात आहे.तसेच पशुपालकांची माहिती भरण्यासही मुदतवाढ देण्याची मागणी जोर धरत आहे. त्यामुळे शासन व प्रशासनस्तरावर त्यासाठीही मुदतवाढ देण्यासंदर्भात विचारविनिमय सुरू असल्याचे प्रशासकीय सूत्रांनी सांगितले.
राज्य सरकारने ११ जानेवारी ते १० जानेवारी या कालावधीत गायीच्या दुधाला प्रतिलिटर पाच रुपये अनुदान देण्याची घोषणा केली. त्यासाठी पशुधन टॅगिंग, पशुपालक व जनावरांची माहिती भरल्यानंतर २८ मार्चपर्यंत दूध संकलनाची माहिती भरण्यास मुदत दिली.त्या मुदतीतही अनेक संस्थांनी माहिती न भरल्याने ३१ मार्चपर्यंत मुदत वाढवून दिली. मात्र, त्यानंतरही माहिती न भरल्याने योजनेत सहभागी संस्थांना दूध संकलनाची माहिती भरण्यासाठी १५ एप्रिलपर्यंत मुदतवाढ दिली आहे.