जयंत पाटलांनी सत्यजित सरूडकरांचा केला करेक्ट कार्यक्रम

लोकसभा निवडणुकीत हातकणंगले लोकसभा मतदार संघ खूपच चर्चेत आला आहे. हातकणंगले लोकसभा मतदार संघात गेल्या आठवडाभरापासून सत्यजित पाटील सरूडकर आणि राजू शेट्टी यांच्यामध्ये थेट लढत होईल, अशी चर्चा होती. या चर्चेमध्ये महायुतीचा उमेदवार असलेले धैर्यशील माने पिछाडीवर दिसत होते तर सत्यजित सरूडकरांना चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र दिसत होते.

मात्र, भाजपचा उमेदवाराचा पराभव व्हावा यासाठी जयंत पाटलांनी गुरूवारी सायंकाळी सुत्रे फिरवली. आ. प्रकाश आवाडेंशी चर्चा केली आणि त्यांना अपक्ष उमेदवारी अर्ज भरण्यास सांगितले. यामुळे हातकणंगले लोकसभा मतदार संघाचे चित्र बदलले आणि इचलकरंजीत पिछाडीवर दिसत असलेले राजू शेट्टी यांना कमी पडणारी मते प्रकाश आवाडे यांच्याकडे वळली आणि अपसुकच राजू शेट्टी हे सर्वात पुढे असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

त्यातच साखर कारखानदार उमेदवार मैदानात उभा करून जयंत पाटलांनी स्वाभिमानीला लोकसभेची संधीच मिळवून दिली आणि सर्वात पुढे असणारे सत्यजित सरूडकर यांच्या मतात उभी फुट होऊन त्यांचा जयंत पाटलांनीच करेक्ट कार्यक्रम केला असल्याचे स्पष्ट झाले आहे.