माढ्यासह सोलापूरचं समीकरण बदलणार…..

 सध्या लोकसभेच्या तयारीत प्रत्येक पक्ष आपापल्या परीने मोर्चेबांधणी करताना पहावयास मिळत आहे. माढा लोकसभेच्या दृष्टीनं राजकीय घडामोडींना वेग आलाय. भाजपनं (BJP) माढ्यातून रणजितसिंह निंबाळकरांना पुन्हा लोकसभेच्या मैदानात उतरवलं आहे. तर भाजपमध्ये नाराज असलेल्या धैर्यशील मोहिते पाटलांनीशरद पवार गटात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. शरद पवार गटाकडून मोहिते पाटील निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर उद्या अकलूजच्या शिवरत्न बंगल्यावर तीन बडे नेते एकत्र येणार आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार (Sharad Pawar) आणि काँग्रेस नेते सुशिलकुमार शिंदे हे विजयसिंह मोहिते पाटील यांच्या शिवरत्न या निवासस्थानी सकाळी भोजनासाठी येणार आहेत.  धैर्यशील मोहिते पाटील यांनी शरद पवार गटात प्रवेश करण्याचा निर्णाय घेतल्यानंतर वेगानं घडामोडी घडताना दिसत आहेत. उद्या शरद पवारांसह  सुशीलकुमार शिंदे हे सकाळी भोजनासाठी अकलूज येथील मोहिते पाटील यांच्या निवासस्थानी येणार आहेत.

या डिनर डिप्लोमसीमुळं माढा आणि सोलापूर लोकसभा मतदारसंघाचं समीकरण सोपं होणार आहे. उद्या सकाळी 11 वाजता शरद पवार आणि सुशीलकुमार शिंदे हे भोजनासाठी अकलूज येथे येणार आहेत. यामुळं राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.