वाळव्यात पंचकल्याण महामहोत्सव कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिका गावोगावी

आदिनाथ दिगंबर जिनमंदिर हाळभाग यांच्यावतीने आयोजीत पंचकल्याण महोत्सव व विश्वशांती महायाग या अत्यंत धार्मिक अशा महामहोत्सवासाठी संयोजन समितीच्यावतीने भव्य मंडप उभारणीच्या कामाला अंतिम स्वरूप आले आहे. समस्त जैन बांधव या भव्य दिव्य सोहळ्याच्या तयारीसाठी अहोरात्र कष्ट घेत आहेत. गावात ठिकठिकाणी स्वागत कमानी उभारण्याचे व विविध डिजिटल पोस्टर्स लावण्याची कामे जोमाने सुरु आहेत. उभारण्याचे काम सुरू आहे. कृष्णा नदीतीरावरील दिगंबर जैन मंदिर हाळभाग येथे ३४ वर्षानंतर नूतन जीनबंब व मानस्तंभ पंचकल्याण प्रतिष्ठा महामहोत्सव व विश्वशांती महायाग २०२४ चे आयोजन भव्य स्वरुपात करण्यात आले आहे.

१५ एप्रिल ते १९ एप्रिल असे ५ दिवस विविध धार्मिक विधी व कार्यक्रम जैनमुनी विद्यासागरजी महाराज, धर्म
सागरजी महाराज, सिद्धांतसागरजी महाराज, विधेहसागरजी महाराज,जीनसेन भटारक पट्टाचार्य महास्वामी, भटारक पट्टाचार्य महाराज कोल्हापूर यांच्या पावन सानिध्यामध्ये संपन्न होणार आहेत.

सोमवारी दि. १५ एप्रिल रोजी मंडप उद्घाटन, पंचामृत अभिषेक, नवग्रह शांती होम होणार आहे. मंगळवारी १६ एप्रिल रोजी त्यागीजनांचे मंगल प्रवचन, धुलीकलश अभिषेक, १७ एप्रील बुधवारी राज्याभिषेक, पालखी प्रदक्षिणा, दीक्षा कल्याणक विधी, गुरुवार दि. १८ एप्रिल रोजी रथोत्सव केवल कल्याण संस्कार व तिथी पूजन आणि दि. १९ एप्रिल रोजी शुक्रवारी शेवटच्या दिवशी निर्वाण कल्याण ध्वजारोहण, कंकण विमोचन, विसर्जन आणि विविध कार्यक्रम होणार आहेत. या यजमानांना हत्तीवरून पोचवणे असे भव्य दिव्य कार्यक्रमासाठी पश्चिम महाराष्ट्रातुन धार्मिक व आध्यात्मिक क्षेत्रातील अनेक मुनीजन वाळव्यात दाखल होत आहेत.

कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिका गावोगावी पाठवण्यात आल्या असून, हजारो जैन बांधव, विविध मान्यवर, श्रावक-श्राविका या महामहोत्सवासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. येणाऱ्या भाविक भक्तांसाठी दररोज महाप्रसादाचे आयोजन करण्यात येणार आहे. त्यासाठी स्वतंत्र मंडप उभारण्याचे काम चालु आहे. वाळवा पंचक्रोशीतील सकल दिगंबर जैन समाज, वीर सेवा दल, वीर महिला मंडळ, शांतीसागर पाठशाळाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत.