कारंदवाडी येथे घोडागाडी स्पर्धा उत्साहात पार

वाळवा तालुक्यातील कारंदवाडी येथे आयोजित घोडागाडी शर्यत उत्साहात पार पडली. प्रदीप दुधारकर, सोनू मेटे आणि विजय सूर्यवंशी, संजय व्हनमाने यांनी प्रथम क्रमांक, मिरासाहेब सनदी आणि राजू सावंत यांच्या घोडागाडीने द्वितीय, तर अक्षय तामगावे, कवठेपिरान यांनी तृतीय क्रमांक पटकावला.

भाजपा युवा मोर्चा तालुका अध्यक्ष प्रवीण माने, उद्योजक सचिन सावंत तसेच वाळवा तालुका भाजपा उपाध्यक्ष उद्योजक गजानन पाटील, अनिल सरदेशमुख, दिगंबर ठाणेकर, विकास यादव, संदीप कोकरे, नितीन रसाळ, रुबाब मुलाणी, प्रकाश व्हनमाने यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन तर उद्योजक सचिन सावंत, अनिल सरदेशमुख, संदीप सावंत, ज्येष्ठ नेते बाळासाहेब कबाडे यांच्या हस्ते बक्षीस वितरण झाले. या स्पधर्धेस नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. त्यानिमित्त
त्यांनी आनंद लुटला.