सांगली लोकसभा मतदारसंघाबाबत (Sangli Lok Sabha Constituency) महाविकास आघाडीमधील (Maha Vikas Aghadi) तिढा काही सुटता सुटत नसल्याचे चित्र आहे. महाविकास आघाडीने सांगलीची (Sangli) जागा अधिकृतरीत्या शिवसेनेला सोडण्यात आल्याची घोषणा केली आहे. मात्र, अजूनही काँग्रेसचे इच्छुक उमेदवार विशाल पाटील (Vishal Patil) यांनी माघार घेतलेली नाही.
पक्षाच्या नेत्यांनी अजूनही यावर फेरविचार करण्याची मागणी त्यांच्याकडून केली जात आहे. अशात आता विशाल पाटील मंगळवारी काँग्रेस पक्षाच्याच वतीने अर्ज भरणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. काँग्रेस पक्षाकडून आपल्याला उमेदवारी मिळावी या मागणीवर विशाल पाटील आजही ठाम आहेत. तसेच त्यांचे समर्थक देखील यासाठी आक्रमक होतांना पाहायला मिळत आहे.
अशात विशाल पाटील मंगळवारी सांगली लोकसभा मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यावेळी ते काँग्रेस पक्षाच्याच वतीने अर्ज भरणार आहेत. जर काँग्रेसच्या चिन्हावरच्या उमेदवारीचा निर्णय झालाच नाही, तर पुन्हा विशाल पाटील अपक्ष अर्ज भरण्याची शक्यता आहे. त्यामुळे काँग्रेसकडून उमेदवारी मिळण्याची विशाल पाटील यांना अजूनही आशा असल्याचे पाहायला मिळत आहे.