‘या’ तीन फुलांची लागवड करेल मालामाल! बंपर नफ्यासाठी जाणून करा लागवड

अत्तर, अगरबत्ती, गुलाल, तेल बनवण्यासाठी फुलांचा वापर केला जातो. त्याचवेळी अनेक प्रकारच्या फुलांमध्ये औषधी गुणधर्म असतात. ज्यामुळे ते औषध बनवण्यासाठी देखील वापरले जातात. म्हणजेच एकंदरीत काय तर फुलांची लागवड करणारा शेतकरी कधीच तोट्यात राहत नाही. भारतात गुलाब, झेंडू आणि सूर्यफूल या फुलांची लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते. या फुलांची लागवड करताना सिंचनाची योग्य व्यवस्था असणे अत्यंत आवश्यक आहे.

झेंडू लागवड
झेंडूच्या फुलांची लागवड उत्तर प्रदेश, हरियाणा, उत्तराखंड, पश्चिम बंगाल, आंध्र प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू आणि महाराष्ट्र या राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर केली जाते. झेंडूच्या फुलांच्या लागवडीला एकरी 30,000 रुपये खर्च येतो. वनस्पतींपासून दर आठवड्याला सुमारे 1 क्विंटल फुले तयार होतात. बाजारात ही फुले 80 रुपये किलोपर्यंत विकली जातात. एका एकरात शेतकऱ्यांना दोन ते तीन लाख रुपयांचा नफा सहज मिळू शकतो.

गुलाब लागवड
गुलाबाची लागवड करून शेतकरी 8 ते 10 वर्षे सतत नफा मिळवू शकतो. आपण त्याच्या एका रोपातून सुमारे 2 किलो फुले मिळवू शकता. हरितगृह, पॉली हाऊस यांसारखे तंत्रज्ञान आल्यानंतर आता या फुलाची वर्षभर लागवड करता येणार आहे. गुलाबाच्या फुलांशिवाय त्याचे देठही विकले जातात. कृषी तज्ज्ञांच्या मते, एक हेक्टरमध्ये 1 लाख रुपये गुंतवून गुलाब लागवडीतून शेतकरी सहजपणे 5 ते 7 लाख रुपयांचा नफा मिळवू शकतो. 

सूर्यफूल
सूर्यफुलाचे पीक 90 ते 100 दिवसांच्या दरम्यान पिकल्यानंतर तयार होते. त्याच्या बियांमध्ये 40 ते 50 टक्के तेल आढळते. वालुकामय आणि हलकी चिकणमाती माती त्याच्या लागवडीसाठी सर्वात योग्य मानली जाते. मधमाशांच्या परागणामुळे सूर्यफुलाची झाडे खूप वेगाने वाढतात. 

शेतकऱ्यांना पिकाच्या आजूबाजूला मधमाशीपालन करण्याचा सल्लाही दिला जातो. असे केल्याने शेतकरी मध उत्पादनातून अतिरिक्त उत्पन्न देखील मिळवू शकतात. 5-30 हजार रुपयांची गुंतवणूक करून एक लाख रुपयांपेक्षा जास्त नफा सहज काढता येतो.