सध्या सगळीकडेच पाऊस आपली हजेरी लावत आहे. काही ठिकाणी जोएदार तर काही ठिकाणी पावसाची रिपरिप सुरु आहे. अनेक ठिकाणी बंधारे पाण्याखाली गेले आहेत. वाळवा तालुक्यातील तांदुळवाडी परिसरातून वारणा नदी वाहते. सध्या चांदोली धरण क्षेत्रात गेले पाच दिवस मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे नदीला पाणी वाढत आहे.
वाढणाऱ्या पाण्याचा व पडत असलेल्या पावसाचा धोका ओळखून तांदुळवाडी परिसरातील गावामधील शेतकऱ्यांनी आपल्या वारणा नदी पात्रा शेजारील विद्युत मोटारी काढण्याची लगबग सुरू केली आहे. वारणा नदी बारमाही वाहते. याचा लाभ अनेक गावांतील शेतकऱ्यांच्या शेतीला होतो, या पार्श्वभूमीवर येथील शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील पिकांना पाणी देण्यासाठी विद्युत मोटारी बसविल्या आहेत. तर काही गावांतील शेतकऱ्यांच्या कडून खाजगी लिफ्ट इरिगेशन तसेच काही सहकारी साखर कारखान्याचे लिफ्ट इरिगेशन आहेत.