उद्या बुधवारी १७ एप्रिल रोजी रामनवमी (RamNavmi) आहे. यंदा ५०० वर्षांनंतर अयोध्येत राममंदिरात रामलल्ला विराजमान झाले आहेत. रामलल्लाचे (Ramlalla) दर्शन घेण्यासाठी सुमारे ४० लाख भाविकांच्या आगमनाचा अंदाज पाहता, राम मंदिर ट्रस्टने १५ ते १८ एप्रिल (15 to 18 april) दरम्यान व्हीआयपी दर्शन आणि व्हीआयपी पासेसवर पूर्णपणे बंदी घातली आहे.मंदिर ट्रस्ट कार्यालयाचे प्रभारी प्रकाश गुप्ता यांच्या म्हणण्यानुसार, या काळात भाविक सुगम दर्शन पास आणि आरती पास वापरू शकणार नाहीत.
ऑनलाइन दिलेले सुगम आणि आरती पास या कालावधीसाठी रद्द करण्यात आले आहेत. रामनवमीच्या मुख्य तारखांना होणारी गर्दी लक्षात घेऊन जास्तीत जास्त भाविकांना रामलालांचे दर्शन घेता यावे, अशी व्यवस्था करण्यात येत असल्याचे कार्यालयीन प्रभारींनी सांगितलेसोमवार ते गुरुवार दररोज सलग २० तास (20 Hrs Darshan) दर्शनाची व्यवस्था करण्यात येणार आहे. रामलल्लाची शोभा, नैवेद्य, राग पूजा आणि आरतीसाठी ४ तासांचा वेळ ठेवण्यात आला आहे.
तसेच, अयोध्या (Ayoddhya) ८० ते १०० ठिकाणी एलईडी स्क्रीन लावण्यात येणार आहे. रामनवमी सोहळ्याचे थेट प्रक्षेपण प्रसार भारती आणि श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्रद्वारे (Sri Ram Janmabhoomi) केले जाईल. रामनवमीच्या दिवशी स्थानिक नागरिकांनी आवश्यक असेल तरच घरा बाहेर पडावे, असे आवाहन राम मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष चंपत राय यांनी केले.