सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी महत्वाची बातमी आहे. भारतीय रेल्वेत रेल्वे प्रोटेक्शन फोर्समध्ये (RPF) कॉन्स्टेबल आणि सब-इन्स्पेक्टरच्या पदांसाठी भरती सुरु झाली.यात एकूण 4660 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. यातील कॉन्स्टेबलसाठी 4208 आणि सब-इन्स्पेक्टरसाठी 452 जागा आहेत. या भरतीची सविस्तर माहिती आपण जाणून घेऊयात…
शैक्षणीक पात्रता
कॉन्स्टेबल पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे शिक्षण मान्यताप्राप्त शैक्षणिक मंडळातून 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तर सब-इन्स्पेक्टर या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून बॅचलर डिग्री घेतलेली असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा किती?
या दोन्ही पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेद्वांरांचे वय 1 जानेवारी 2024 पर्यंत 18 ते 28 वर्षे दरम्यान असणे आवश्यक आहे. यासाठी वयाचा दाखला सादर करावा लागणार आहे.
निवड प्रक्रिया
रेल्वेतील या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना लेखी परीक्षा (CBT 1 आणि CBT 2), एक शारीरिक चाचणी आणि शेवटी कागदपत्र पडताळणी पास करावी लागेल. हा प्रत्येक टप्पा पास करणाऱ्या उमेदवाराती अंतिम निवड केली जाईल. त्यानंतर उमेदवारांना प्रशिक्षण दिले जाईल आणि त्यानंतर त्यांना नियुक्ती दिली जाईल.
अर्ज करण्याची तारीख आणि वेबसाईट
RPF कॉन्स्टेबल किंवा सब-इन्स्पेक्टर पदांसाठी अर्ज करू इच्छिणारे उमेदवार 15 एप्रिल 2024 पासून 14 मे 2024 पर्यंत rrbapply.gov.in. या वेबसाईटवर अर्ज करू शकतात.