जिल्ह्यात एकास एक लढत झाल्यास भाजपचा (BJP) पराभव शक्य आहे. ‘सांगली’बाबतचा (Sangli Lok Sabha) वरिष्ठ पातळीवर निर्णय झाला असल्याने आता कोणी वेगळी भूमिका घेऊ नये, सांगलीत योग्य लढत व्हावी, यासाठी मी पुढाकार घेतला होता, तरीही काहीजण सोशल मीडियाद्वारे माझ्याबद्दल अपप्रचार करीत आहेत.
महाविकास आघाडीचा सांगलीचा उमेदवार वरिष्ठ पातळीवरून तिन्ही पक्षाच्या नेत्यांनी जाहीर केला आहे, असे स्पष्ट मत जयंत पाटील (Jayant Patil) यांनी व्यक्त केले.आता एकसंधपणे आघाडीच्या उमेदवाराच्या पाठीशी राहावे. जुना इतिहासातील वाद नको, भविष्याचा विचार करा. ही निवडणूक म्हणजे शेवटची नाही, असा टोलाही राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी विशाल पाटील (Vishal Patil) यांचे नाव न घेता येथे लगावला.
