स्वाइन फ्लू’ने(Swine Flu) (H1N1) नाशिककरांची चिंता वाढवली आहे. शहरासह जिल्ह्यात स्वाईन फ्लूचा धोका दिवसेंदिवस वाढत आहे. नाशिकमध्ये स्वाईन फ्लूचे तीन रुग्ण आढळले तर एकाचा स्वाईन फ्लूने मृत्यू देखील झाला आहे. मृत्यू झाल्याने शहरासह जिल्हाभरात खळबळ उडाली आहे.
जिल्ह्यात सर्वत्र विषाणूजन्य तापाची साथ सुरु असून त्यात आता स्वाईन फ्लूने भर घातल्याने जिल्ह्यात आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर दिसून येत आहे. आगामी काही दिवसात स्वाईन फ्लूने आपले पाय पसरु नये म्हणून जिल्ह्यात आरोग्य विभागाकडून मार्गदर्शक सूचना देखील जारी करण्यात आल्या आहेत.
