सध्या उन्हाळ्याला जोरदार सुरूवात झाली आहे. त्यातून राज्यभरात उकाडा वाढला असून IMD नंही काही शहरांना याबाबत इशारा दिला आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) मुंबई, ठाणे आणि रायगडला येल्लो अलर्ट जाहीर केला आहे.येथे उष्णतेची लाट येऊ शकते यासाठी इशारा देण्यात आला आहे.
त्यामुळे नागरिकांनी योग्य ती खबरदारी घेणे हे फारच महत्त्वाचे आहे. होळी झाल्यानंतर उन्हाच्या तीव्रेत मोठी वाढ झाली आहे. त्यातून गेल्या काही दिवसांपासून मात्र ही लाट वाढते आहे. अशातच नागरिकांनाही उन्हाचा त्रास सहन करावा लागतो आहे. यंदा मोठ्या प्रमाणात उन्हाळा अनुभवला जाऊ शकतो असा इशाराही जगभरातून देण्यात येतो आहे. मंगळवारी भारतीय हवामान विभागाने येल्लो अलर्ट घोषित केला आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये चिंता वाढली आहे.
उत्तर भारतातही उष्णतेच्या तीव्र लहरी पाहायला मिळणार आहेत. त्याचसोबत अनेक शहरांमध्ये पाण्याची कपातही पाहायला मिळते आहे. अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यांमुळे मोठ्या प्रमाणात धुळीचे साम्राज्य पाहायला मिळते आहे. याचे कारण चहूबाजूंनी होणाऱ्या पायाभूत प्रकल्पांचे बांधकाम आणि इमारतींचे कंस्ट्रक्शन. बांधकामांचा वेग जोरात असल्याने धुळीचा त्रास हा सामान्य नागरिकांना होतो आहे.