सांगली लोकसभा मतदारसंघाची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. कारण या मतदारसंघातून महाविकास आघाडीत थोडी नाराजी पाहायला मिळत आहे. कारण महाविकास आघाडीकडून ठाकरे गटाचे चंद्रहार पाटील निवडणूक लढवत आहेत. तर काँग्रेसचे नेते विशाल पाटील यांनी देखील उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. या सर्व घडामोडींवर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी जाहीर वक्तव्य केलं. सांगलीच्या उमेदवारीवरुन सर्वांचा रोख माझ्यावर होता. पण माझा काहीही संबध नसल्याचे जयंत पाटील यावेळी म्हणाले.
आज सांगली लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रहार पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी महाविकास आघाडीचे सर्व दिग्गज नेते उपस्थित होते. यावेळी जयंत पाटील देखील उपस्थित होते. सांगली लोकसभेच्या जागेचा विषय हा उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचा आहे. उद्धव ठाकरेंच्या एकदा डोक्यात आले की पुन्हा माघार नसते असं वक्तव्य जयंत पाटील यांनी केलं आहे. सांगलीच्या उमेदवारीवरुन सर्वांचा रोख माझ्यावर होता. पण माझा काहीही संबध नसल्याचे जयंत पाटील यावेळी म्हणाले.
