पाडळी (ता. हातकणंगले) येथील घोगराई नागरी सहकारी पतसंस्थेच्या मृत दोन सभासदांच्या नातेवाइकांना प्रत्येकी एक लाखाच्या धनादेशाचे वाटप संस्थेचे अध्यक्ष प्रकाश पाटील, उपाध्यक्ष नामदेव पाटील यांच्यासह संचालक मंडळाच्या हस्ते केले.
पतसंस्थेच्या सभासदांना कर्जातून केवळ ७८ रुपये विमा संरक्षण देत आहे. सभासद विक्रम मोहिते (रा. घुणकी), नामदेव मुळीक (रा. पाडळी) यांचे अपघाती निधन झाले. त्यांच्या कर्जातून ७८ रुपये विमा रक्कम घेतली होती. (कै) विक्रम यांचा मुलगा विशांत व शुभम मोहिते यांना एक लाख रुपयांचा धनादेश दिला.
संचालक धनंजय देसाई, विलास मुळीक, दिनकर पाटील, राजाराम पाटील, कोंडिबा पवार, निवृत्ती वाघमोडे, रमेश सवळेकरी, मधुकर दाभाडे, सुरेश पाटील, आदी उपस्थित होते. व्यवस्थापक देवदास जाधव यांनी आभार मानले.