500 कोटींचं बजेट असणाऱ्या ‘पुष्पा 2’ नं प्रदर्शनाआधीच कमावले 1200 कोटी? अल्लू अर्जुनचा नवा रेकॉर्ड

दाक्षिणात्य अभिनेता अल्लू अर्जुनचा ‘पुष्‍पा 2’ ची प्रेक्षक आतुरतेनं प्रतिक्षा करत आहेत. 15 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटासमोर त्यावेळी दुसरा कोणताही चित्रपट नाही. कारण ‘सिंघम अगेन’ च्या निर्मात्यांनी आधीच चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारिख पुढे ढकलली आहे. अशात अल्लू अर्जुनचा हा चित्रपट नवा रेकॉर्ड करु शकतो असं सगळ्यांचं म्हणणं आहे. दरम्यान, या सगळ्यात मोठी बातमी समोर आली आहे की चित्रपट प्रदर्शनाआधीच त्यानं नवा रेकॉर्ड केला आहे. 500 कोटींचा बजेट असणाऱ्या चित्रपटानं 1200 कोटींची कमाई केली आहे. 

दरम्यान, कोणालाही याविषयी काही माहिती देण्याची गरज नाही की 2021 मध्ये जेव्हा चित्रपटाचा पहिला भाग प्रदर्शित झाला होता. तेव्हा त्यानं सगळ्यांची मने जिंकली होती. सुकुमार दिग्दर्शित या चित्रपटानं अनेक रेकॉर्ड मोडले होते. या सगळ्यात आता ‘ट्रॅक टॉलिवूड’ च्या रिपोर्टनुसार, या चित्रपटानं आता KGF 2 आणि RRR या चित्रपटाचे प्रदर्शित होण्या आधीचे रेकॉर्ड मोडले आहेत.