वर्षातून एकदा येणारा आंबा मनसोक्त खाल्ल्याशिवाय उन्हाळ्याची मजा येत नाही. आंबा ‘फळांचा राजा’ म्हणून ओळखला जातो उगीच का काय? आंबा हे असे फळ आहे जे अगदी लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सगळ्यांचे आवडते आहे. असं म्हणतात मौसमी फळांचे सेवन कायम फायदेशीर ठरते. पण आंबा मुळातच उष्ण, त्यात येतो सुद्धा उन्हाळ्यात.
मग अशावेळी आंबा खाताना किंवा आमरस पिताना मनात भीती राहते. तर याच भीतीचं सोल्युशन आम्ही तुम्हाला देणार आहोत.आमरसाचे सेवन किती करावे? त्याचे सेवन केल्याचे शरीराचे काही नुकसान तर होत नाही ना? आणि असे बरेच प्रश्न कितीतरी लोकांना पडतात. तर आज आम्ही तुम्हाला उष्णतेपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी आमरसाचे सेवन कसे आणि किती करावे? याबाबत महत्वाची माहिती देणार आहोत.
आमरसाचा सेवन आरोग्यासाठी चांगले असले तरीही मधुमेहींनी मात्र याचे रोज सेवन करू नये. यामुळे तुमची ग्लुकोज पातळी अनियंत्रित होऊ शकते. त्यामुळे दिवसभरात जास्तीत जास्त १ ग्लासपेक्षा जास्त आमरस पियू नका. साधारण १ ग्लास आमरसात सुमारे १७० कॅलरीज असतात.
आंब्याचा रस जास्तीत जास्त २ दिवस ठेवता येईल. पण त्याहून अधिक काळ जर तुम्ही आमरस साठवला तर त्याचे गुणधर्म कमी होतात. तसेच तुमच्याकडून आमरस दीर्घकाळ राहिला तर त्याचे सेवन टाळावे. शिवाय आमरस बनवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या आंब्यांवर काळे डाग किंवा ओरखडे नसतील याची काळजी घ्या.
जर तुम्हाला मधुमेहाचा त्रास असेल आणि तुम्ही आमरसाचे जास्त सेवन केलात तर तुमच्या रक्तातील साखरेची पातळी अनियंत्रित होऊ शकते. शिवाय जर तुम्ही गर्भवती असाल तर डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय आंबा खाऊ नये. तसेच आमरसाचे अति सेवन केल्याने घसा खवखवणे किंवा ऍलर्जीचा त्रास संभवतो. याशिवाय काही लोकांना पोटदुखी, मळमळ किंवा उलट्या देखील होऊ शकतात.