मंत्रिपद गेल्यानंतरच्या परिस्थितीवर व्यक्त केली खदखद…..

सदाभाऊ खोत हे रयत क्रांती संघटनेचे प्रमुख आहेत. भाजप-शिवसेना सरकारमध्ये त्यांना राज्यमंत्री म्हणून संधी देण्यात आली होती. यावेळी महायुतीच्या सरकारमध्ये मात्र, सदाभाऊ खोत यांनी स्थान मिळालं नाही. त्याचबरोबर सदाभाऊ खोत यांनी लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा देखील व्यक्त केली होती.

हातकणंगले मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याचं वक्तव्य त्यांनी केलं होतं. मात्र, महायुतीत शिवसेना शिंदे गटाला ही जागा सुटली आहे. पुन्हा सेनेने धैर्यशील मानेंना उमेदवारी जाहीर केलीय. त्यामुळं सदाभाऊ खोत यांन अनेकवेळा खंत व्यक्त केली आहे. त्यामुळं येणाऱ्या काळात सदाभाऊ खोतांना भाजप काही संधी देणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.