केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ही औषधं होणार स्वस्त!

जीएसटी काऊन्सिलची 54वी बैठक पार पडली. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत सामान्य नागरिकाच्या आयुष्यावर परिणाम करणारे अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. जीएसटी काऊन्सिल काऊन्सिलच्या बैठकीत कर्करोगावरील औषधं, धार्मिक यात्रेसाठी हेलिकॉप्टरची सेवा घेणे आदी बाबींवरील जीएसटी हटवला आहे. निर्मला सीतारामन यांनी सांगितल्यानुसार राज्य वा केंद्र सरकारच्या कायद्यानुसार स्थापन झालेले कोणतेही विद्यापीठ वा संशोधन केंद्र सरकार किंवा खासगी क्षेत्रातून निधी मिळवत असेल तर त्यावर जीएसटी आकारला जाणार नाही.

गेल्या महिन्यात आयआयटी दिल्ली तसेच अन्य शैक्षणिक संस्थांनी संशोधनासाठी निधी मिळवला होता, त्यानंतर या संस्थांना जीएसटीची नोटीस मिळाली होती. यावर निर्मला सीतारामन यांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर आता अर्थमंत्रालयाने हा निर्णय घेतला आहे. डायरेक्टर जनरल ऑफ जिएसटी इंटेलिजेन्सच्या म्हणण्यानुसार आयआयटी दिल्लीसह एकूण सात संस्थांना जीएसटीची नोटीस पाठवण्यात आली होती.  

जीएसटी काऊन्सीलच्या बैठकीत इतरही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. याआधी फरसाणवर 18 टक्के जीएसटी आकारला जायचा. आता हा जीएसटी 12 टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आला आहे. सोबतच कर्करोगावरील 12 टक्के असलेला जीएसटी कमी करून 5 टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आलेला आहे. म्हणजेच आता कर्करोगावरील औषधं स्वस्त होणार आहेत.