जोतिबा यात्रेकरूंसाठी उद्यापासून अन्नछत्र

शिवाजी चौक तरुण मंडळातर्फे पंचगंगा नदी घाटावर सोमवार (ता. २२) पासून सलग तीन दिवस मोफत अन्नछत्र, तर शिरोली पुलाचीतील सौराष्ट्र कडवा पटेल समाजतर्फे नदी स्नानानंतर अल्पोहाराची सोय करण्यात आली आहे.प्रतिवर्षांप्रमाणे यंदाही मंडळातर्फे सलग तीन दिवस मोफत अन्नछत्र सोमवारी (ता. २२) ते बुधवारी (ता. २४) दरम्यान सुरू राहणार आहे.

तर पंचगंगा नदी स्नान केल्यानंतर सकाळी ७ ते ९ वाजेपर्यंत जोतिबा यात्रेकरूंसाठी शिरा, पोहे, चहा, पाणी मोफत दिले जाणार आहे. सलग तीन दिवसांत २५ हजार यात्रेकरू याचा लाभ घेतील, अशी व्यवस्था समाजातर्फे करण्यात आली आहे. यासाठी समाजाचे अध्यक्ष दिलीप पटेल, राजन पटेल, चेतन पटेल परिश्रम घेत आहेत. तरी याचा लाभ यात्रेकरूंनी घ्यावा, असे आवाहन अल्पोहार समितीचे अध्यक्ष बाळासाहेब भोसले यांनी केले आहे.