मोटारीमधून अवैध दारूची वाहतूक केल्याप्रकरणी पोलिसांनी कारवाई करून २ लाख ८७ हजारांचा मुद्देमाल जप्त केला.याप्रकरणी अविनाश राजेंद्र कदम, सुरेश तानाजी डाळे (रा. बागणी, ता. वाळवा) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पोलिस निरीक्षक विलास भोसले यांना अवैध दारू वाहतूक करत असल्याची माहिती मिळाली. कदम व डाळे हे वडगाव येथून आष्ट्याकडे मोटारीमधून (एमएच १४ बीके ४२७०) दारू घेऊन जात होते.
त्यानुसार पोलिस मिलिंद टेळी, जितेंद्र पाटील, संतोष पाटील, अनिल अष्टेकर यांच्या पथकाने सापळा रचला. शेतकरी संघाच्या पेट्रोल पंपासमोर ही कारवाई करण्यात आली. अधिक तपास हवालदार जितेंद्र पाटील करीत आहेत.