वारणा नदीला आलेल्या महापुरामुळे लाटवडे – भेंडवडे रस्ता गेले आठवडाभर पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे लाटवडे येथील श्रीरामनगर भागातील सुमारे आठशे लोकांचा संपर्क तुटला आहे. मंगळवारी आमदार राजूबाबा आवळे यांनी नांगरे मळा येथे पाणी असलेल्या ठिकाणची पाहणी केली. यावेळी त्यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला. यावेळी शेतीच्या नुकसानीचे पंचनामे तातडीने करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या तसेच या रस्त्यासंदर्भात उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले.गेल्या तीन महापुरात
रस्ता पाण्याखाली गेला होता तेव्हाही श्रीरामनगरमधील लोकांचा संपर्क तुटला होता. गेली आठ दिवस झाले रस्ता च बंद आहे.
शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना शाळेला जाता येत नाही. त्यामुळे या ठिकाणी कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी करण्यात आली. यावेळी शिवदत्त पाटील, पाटील, बाजार समितीचे माजी सभापती चेतन चव्हाण, संदीप पाटील, शशिकांत पाटील, शामराव वाघमारे, विजय पाटील, विशाल भोपळे, मार्तंड वाघमारे, संतोष वाघमारे यांच्यासह
गेल्या तीन महापुरात हा रस्ता उपस्थित होते.