सध्या प्रचाराचा धुरळा उडाला आहे. गावोगावी जावून भेटीगाठी, सभा घेण्याचे काम वेगाने सुरु आहे. शिरोली गाव स्वाभिमान जपणारे गाव आहे. येत्या पंधरा दिवसात संपूर्ण लोकसभा मतदार संघ भगवामय होणार आहे. शिरोली ते नृसिंहवाडी पर्यंतच्या पंचगंगा नदी काठावरील प्रत्येक गावात एसटीपी प्लॅन्ट उभे करून नदी प्रदुषण मुक्त करण्यात येईल.
शिरोली ते सांगली नॅशनल हायवेच्या रस्त्यासाठी ८०० कोटी रुपये निधी लावला आहे. तसेच भविष्यकाळात मतदारसंघात दहा हजाराची गुंतवणुक करून युवकांच्या हाताला काम देण्यासाठी उद्योग उभे केले जाणार आहेत. तरी बहुमताने विजयी करण्याचे आवाहन खास धैर्यशील माने यांनी केले. शिरोली (ता. हातकणंगले) येथे लोकसभा निवडणुकीच्या प्रचारार्थ ते बोलत होते.