आम. राजूबाबा आवळे यांच्या विजयासाठी…..

हातकणंगले तालुका काँग्रेस पदाधिकारी मेळावा नुकताच पार पडला. या मेळाव्यात आमदार राजूबाबा आवळे, राहुल खंजिरे, शशांक बावचकर, भगवान जाधव, शशिकांत खवरे आदींनी प्रमुख उपस्थिती लावली होती. महाराष्ट्रात महाविकास आघाडीची सत्ता आणण्यासाठी प्रत्येक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी गाव पातळीवर पक्षाचे विचार, धोरण पोहोचवावे व काँग्रेस पक्षाचा हात बळकट करावा असे आवाहन साके यांनी केले.

राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे विद्यमान आमदार राजूबाबा आवळे यांना विजयी करण्यासाठी बूथ पातळीवर प्रयत्नशील राहावे असे आवाहन हातकणंगले विधानसभा मतदारसंघाचे निरीक्षक व आंध्र प्रदेशचे माजी मंत्री साके शैलजानाथ यांनी केले.

हातकणंगले विधानसभा मतदारसंघ हा सर्वधर्म समभाव जपणारा आहे. गेली पाच ते सहा निवडणुका राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने जिंकलेल्या आहेत. महाराष्ट्रात महाविकास आघाडीची सत्ता येणार आहे त्याचे आपण साक्षीदार बनूया आणि आमदार सतीश पाटील यांचे हात बळकट करूया असे आवाहन आमदार आवळे यांनी केले.