RR vs MI Weather Report: मुंबई राजस्थानचा खेळ बिघडवणार का पाऊस……

 आयपीएलमध्ये (IPL 2024) आज दोन तुल्यबळ टीम आमने सामने येणार आहेत. आयपीएलमध्ये आज 38 वी मॅच राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) आणि मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) यांच्यात होणार आहे. आज ही मॅच सायंकाळी साडे सात वाजता जयपूरच्या  सवाई मानसिंह स्टेडियमवर होणार आहे. राजस्थानचे प्रेक्षक या मॅचसाठी उत्सुक आहेत. मॅच सुरु होण्यापूर्वी जयपूरमधील वातावरण कसं राहिल हे पाहणं महत्त्वाचं आहे. 

एक्यू वेदरच्या रिपोर्टनुसार जयपूरमध्ये दिवसाचं तापमान 35 अंश सेल्सियस असेल तर रात्रीच्या वेळी तापमान 25 अंश सेल्सिअस इतकं तापमान असेल. आकाश निरभ्र राहण्याचा अंदाज असून दिवसा पावसाची शक्यता ४ टक्के असेल तर रात्री २ टक्के पावसाची शक्यता आहे. राजस्थान रॉयल्स यंदाच्या आयपीएलमध्ये सातपैकी सहा मॅच जिंकून टॉपवर आहे. राजस्थान रॉयल्सला एका मॅचमध्ये पराभव स्वीकारावा लागला आहे. राजस्थान 12 गुणांसह + 0.677 च्या नेट रन रेटसह गुणतालिकेत पहिल्या स्थानावर आहे.  

दुसरीकडे मुंबई इंडियन्सची स्थिती वेगळी आहे. मुंबई इंडियन्सनं यंदाच्या आयपीएलमध्ये सात मॅच खेळल्या आहेत. मुंबईला चार मॅचमध्ये पराभव स्वीकारावा लागला आहे. तर, त्यांनी तीन मॅचमध्ये विजय मिळवला आहे. मुंबई इंडियन्सनं दिल्ली कॅपिटल्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि पंजाब किंग्जला पराभूत केलं आहे. मुंबई सहा गुणांसह गुणतालिकेत सातव्या स्थानावर आहे. मुंबई इंडियन्सनं -0.133 इतकं रनरेट आहे. 

यंदाच्या आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स यापूर्वी एकदा आमने सामने आले आहेत. आयपीएलमधील 14 वी मॅच वानखेडे स्टेडियमवर झाली होती. त्यामध्ये राजस्थान रॉयल्सनं मुंबई इंडियन्सला पराभूत केलं होतं. मुंबई इंडियन्सनं वानखेडे स्टेडियमवर 20 ओव्हरमध्ये 9 विकेट वर 124 धावा केल्या होत्या. राजस्थान रॉयल्सनं 15.3 ओव्हरमध्ये 4 विकेटवर 127 धावा केल्या होत्या. राजस्थान रॉयल्सनं सहा विकेटनं मॅच जिंकली होती.  

मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स यापूर्वी 29 वेळा आमने सामने आले आहेत. मुंबई इंडियन्सनं 15 वेळा मॅच जिंकल्या आहेत. तर, राजस्थान रॉयल्सनं 13 मॅच जिंकल्या आहेत. 29 पैकी एका मॅचचा निकाल लागला नव्हता.