शेतीत फळ पिकांबरोबरच भाजीपालाशेती देखील मोठ्या प्रमाणात केली जाते. मात्र शेती करताना कुठलं पीक कधी घ्यावं किंवा लागवड करावी, हे ठाऊक असणं महत्वाचं असतं. जेणेकरून वेळेवर केलेली लागवड शेतकऱ्यांना चांगलं उत्पन्न आणि नफा मिळवून देत असते. त्यासाठी पिकांचं योग्य व्यवस्थापन करणे देखील आवश्यक असते. भाजीपाला शेती करत असताना कोणत्या भाजीपाला पिकाची लागवड कधी करावी, हे समजून घेऊया…
सर्वांना आपल्या आहारात दररोज एक नवीन हिरवी पालेभाजी हवी असते. मात्र हि पालेभाजी, फळभाजी शेतात तयार होण्यासाठी कधी महिना तर कधी दोन महिने असा कालावधी लागत असतो. सध्या बाजारात मिळणारा बहुतांशी भाजीपाला हा रासायनिक औषधांच्या वापरातून निर्माण झालेला असतो. त्यामुळे मोठ्या प्रमाणात सेंद्रिय भाजीपाल्याची मागणी आता वाढत आहे. तसेच अनेक शेतकरी आपल्या शेतात छोटीशी परसबाग करत आपल्या कुटुंबापुरता मर्यादित भाजीपाला स्वतः पिकवून तो स्वयंपाक घरातील वापरात घेत आहे.
शहरी भागात हि अनेक जण आपल्या छतावर किंवा बालकनीत विविध भाजीपाला पिकवतात व त्यातून आपल्या स्वयंपाक घराची गरज भागवतात. काही शेतकरी तर गुंठा दोन गुंठा जागेत भाजीपाला शेती करून त्यातून आपला बाजारहाट (साप्ताहिक खर्च) भागवतात. मात्र हे सर्व करत असताना बऱ्याचदा कोणता भाजीपाला कधी लावावा याची अनेकांना जाण नसते.
यासाठीच आपण आज बघणार आहोत की कोणता भाजीपाला कोणत्या महिन्यात लावला जातो.
जानेवारी : टोमॅटो,भेंडी, काकडी, दुधी, भोपळा, कारली, दोडका, कलिंगड, खरबूज, गवार, घेवडा, रताळी, ढेमसे
फेब्रुवारी : वांगी, टोमॅटो, काकडी, दुधी, भोपळा, कारली, दोडका, कलिंगड, खरबूज, घेवडा, रताळी, ढेमसे
मार्च : वांगी, काकडी
एप्रिल : आलं, टोमॅटो
मे : आलं, टोमॅटो, फुलकोबी, हळद
जून : हळद, वांगी, भेंडी, कोथिंबीर, मिरची, टोमॅटो, वाल, फुलकोबी, बटाटा, काकडी, कारली, दोडका, कलिंगड, खरबूज, मेथी, गवार, घेवडा, रताळी, अळू, शेवगा, शेपू
जुलै : कारली, मिरची, वांगी, भेंडी, दोडका, कांदा, बटाटा, शेवगा, फुलकोबी, वाल, कलिंगड, खरबूज, गवार, घेवडा, काकडी, ढेमसे, कोथिंबीर
ऑगस्ट : कांदा, वांगी, ढेमसे, मुळा, गाजर, फुलकोबी, कोथिंबीर
सप्टेंबर : कांदा, टोमॅटो, वाल, पत्ताकोबी, फुलकोबी, पालक, रताळी, अळू
ऑक्टोबर : कांदा, टोमॅटो, वाल, पत्ताकोबी, फुलकोबी, बटाटा, वाटाणा, लसूण, अळू
नोव्हेंबर : कांदा, पत्ताकोबी, फुलकोबी, बटाटा, वाटाणा, लसूण
डिसेंबर : कांदा, फुलकोबी, पालक