राज्यातील शाळांचे 2024-25 या शैक्षणिक वर्षातील सुट्यांचे नियोजन जाहीर करण्यात आले आहे. या वर्षांत दीड महिन्याच्या उन्हाळी व 16 दिवसांच्या दिवाळी सुट्यांसह एकूण 76 सुट्ट्या या वर्षात मिळतील.
या सुट्ट्यांमध्ये शासन निर्धारित 20, विभागीय आयुक्त निर्धारित 3 व मुख्याध्यापक स्तरावरील 2 सुट्यांचा समावेश आहे. सरकारच्या नियोजनानुसार उन्हाळी सुट्या 2 मे ते 14 जून, दिवाळी सुट्या 28 ऑक्टोबर ते 12 नोव्हेंबरपर्यंत असतील.
मार्च-एप्रिल महिन्यात शालेय विद्यार्थ्यांच्या वार्षिक परीक्षा संपल्या. आता 1 मे रोजी निकाल जाहीर होतील. 2 मे पासून उन्हाळी सुट्टी असेल हे शैक्षणिक वर्ष संपत असताना शालेय शिक्षण विभागाने आगामी सुट्यांचे नियोजन जाहीर करण्याचे आदेश शिक्षणाधिकारी कार्यालयांना दिले होते.