सध्या लोकसभेच्या निवडणुकीच्या तयारीत प्रत्येक पक्ष आपापल्या परीने सभा, मेळावे यांचे आयोजन करताना दिसत आहेत. हातकणंगले लोकसभा मतदारसंघात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी विरोधात महायुतीचे खासदार धैर्यशील माने अशी लढत आहे. तर महायुतीसोबत रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत असल्याने त्याला अधिक रंगत आली आहे.
हातकणंगले लोकसभा मतदारसंघ हाच राज्यात सर्वात जास्त चर्चेचा विषय बनला आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी हे या मतदारसंघातून रिंगणात असल्याने त्यांच्या विरोधात महायुतीचे खासदार धैर्यशील माने निवडणूक लढवत आहेत. तर महायुतीसोबत रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत असल्याने त्याला अधिक रंगत आली आहे.
रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत हे राजू शेट्टींवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. सदाभाऊ खोत म्हणाले, महान शेतकरी नेत्यांचे एकला चलो वगैरे असं काही नव्हतं. सर्वांच्या दाराला जाऊन आरत्या करून आलेले हे नेते आहेत. भाजपला देखील आतल्या अंगाने सांगितलं होतं की निवडून आलो की मी तुमचाच.कौरवांच्या मध्ये अभिमन्यू जन्माला आलाय हे मी हातकणंगले लोकसभा मतदारसंघात बघत आहे.
राजू शेट्टी म्हणजे कौरवांचा अभिमन्यू आहे. त्यांच्या हातात आता गळा काढण्याशिवाय काही राहिले नाही, अशा शब्दात सदाभाऊ खोत यांनी टोला लगावत ‘त्यांचा नंबर आता ‘थ्री वर, इधर नही आना, उधर ही रहना, सर्व काम खतम अशा शब्दात सदाभाऊ खोत यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांची खिल्ली उडवली आहे.