शुक्रवारी 26 एप्रिलला होणार आळतेची धूळोबा यात्रा

हातकणंगले तालुक्यातील आळते या गावचे क्षेत्र धुळोबा व आलमप्रभू देवालयाची यात्रा ही 26 एप्रिल म्हणजेच शुक्रवारच्या दिवशी होणार आहे. या यात्रेच्या निमित्ताने मंदिराची रंगरंगोटीसह परिसरामध्ये विद्युत रोषणाईची सजावट करण्यात आलेली आहे.

तसेच भाविकांसाठी स्वच्छ पिण्याच्या पाण्याची व्यवस्था देखील करण्यात आलेली आहे. भक्तांसाठी राहण्याची खास सोय करण्याचे काम सुरू आहे. या यात्रेसाठी महाराष्ट्र तसेच कर्नाटकतून अनेक भाविक येत असतात. धुळोबा देवालयामध्ये मानाच्या सासन काठ्या नाचवत धुळोबाच्या नावाने चांगभलंचा गजर करत डोंगराकडे सकाळपासूनच येत असतात.

शुक्रवारी अनुराधा नक्षत्रावर रात्री बारा वाजता पालखी प्रदक्षिणा सोहळा पार पडणार आहे अशी माहिती यात्रा कमिटी व आळते गुरव समाजातर्फे दिलेली आहे.