कुणाला वाटलं होतं की, शिल्पाचा पती राज कुंद्रा ज्याच्यावर पॉर्नोग्राफी व्हिडिओ तयार करुन ते परदेशात पाठविल्याचे आरोप करण्यात आले होते. त्याप्रकरणी त्याला काही दिवस तुरुंगाची हवाही खावी लागली होती. याच राज कुंद्राचा आता UT 69 नावाचा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याची चर्चा आहे.
शिल्पा शेट्टीला राजमुळे खूपच मोठ्या प्रमाणावर मानसिक त्रासाला सामोरं जावं लागलं होतं. त्यामुळे तिला ज्या रियॅलिटी शो मध्ये परिक्षकाची भूमिका देण्यात आली होती त्यातून तिनं काही काळापुरती माघारही घेतली होती. शिल्पाला नेटकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात ट्रोलही केले होते. अखेर तिनं राजमुळे मला विनाकारण ट्रोल केले जाऊ नये असे आवाहन देखील नेटकऱ्यांना केले होते.
राज कुंद्राचा काल एक व्हिडिओ समोर आला होता. त्यामध्ये त्यानं मला काहीही बोला पण माझ्या बायको आणि मुलांना ट्रोल करु नका. अशी विनवणी त्यानं नेटकऱ्यांना केली होती. याचा परिणाम असा की, राजच्या आगामी चित्रपटाविषयी वेगवेगळी चर्चा सुरु झाली आहे.त्याचा UT 69 चित्रपट चर्चेचा विषय आहे. त्याविषयी काही दिवसांपूर्वी फराह खान आणि मुनव्वर फारुखी यांनी प्रतिक्रिया दिली होती.
आपण जेव्हा चित्रपट काढणार आहोत आणि त्यामध्ये काम कऱणार असल्याचे शिल्पाला सांगितले तेव्हा तिचा संताप झाला होता. तिनं माझ्याकडे पाहून चप्पल भिरकावून दिली होती. याविषयी राजला विचारले असता त्यानं जी प्रतिक्रिया दिली ती चर्चेत आली आहे.