फोटो काढणाऱ्या पापाराझीला ढकलत लिफ्टमध्ये घेऊन गेला

रणबीर कपूर बॉलिवूडमधील टॉपचा अभिनेता आहे. रणबीर जितका अभिनयामुळे चर्चेत असतो, तितकाच त्याच्या कृत्यांमुळेही चर्चेत असतो. सध्या अभिनेता त्याच्या एका वागणुकीमुळे सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आला आहे.

सोशल मीडियावर रणबीर कपूरचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. तो त्याच्या कारमधून उतरतो आणि थेट लिफ्टमध्ये जातो. लिफ्टमध्ये जात असताना, त्याच्या रस्त्यात एक पापाराझी येतो, त्याला बाजुला न करता त्यालाही तो थेट लिफ्टमध्येच नेले आहे. पापाराझी रणबीरचा व्हिडीओ शूट करत होता, त्याचे फोटो आणि व्हिडीओ शूट करताना तो थेट त्याला लिफ्टमध्ये नेतो. बुधवारी संध्याकाळी रणबीर कॅमेऱ्यामध्ये मुंबईमध्ये स्पॉट झाला. त्याचे हे कृत्य पाहून नेटकरी त्याच्यावर हसत आहेत. 

यावेळी त्याने टीशर्ट आणि जीन्स असा लूक केला होता. तो त्याच्या कारमधून उतरताच त्याला पापाराझींनी घेरले आहे. यावेळी तो जरा चिडला होता, पण आपल्या चेहऱ्यावर त्याने स्मितहास्यच कायम ठेवले आहे. यावेळी त्याच्या चेहेऱ्यावरील हावभाव पाहून अनेकांनी त्याला ट्रोल केले आहे तर काहींनी त्याची खिल्ली उडवली आहे. एक युजर म्हणतो, हाहाहा कमाल आहे. तर आणखी एक म्हणतो, कशाला उगाच त्याला किडनॅप करतो. असाच तुझा मस्तीखोर स्वभाव राहुदे.