भैरवनाथ शुगर उद्योग समूहाचे व्हाईस चेअरमन अनिल सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त मंगळवेढा तालुक्यातील सलगर(बु) येथे भव्य कुस्ती स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. हजारो कुस्ती शौकिनांच्या उपस्थितीत अनिल दादा सावंत कुस्ती किताब पुण्याच्या रविराज चव्हाण यांने प्रथम क्रमांकाचा कुस्ती किताब पटकावला आहे. यावेळी पै.रविराज चव्हाण (पुणे) व विरुद्ध पै. विजय शिंदे यांच्यात लढत झाली. यामध्ये रविराज चव्हाण यांनी दोन लाख रुपयांचे पहिले पारितोषिक पटकावले.
तर दोन नंबरला पै.पृथिराज चौंडे (नंदेश्वर-) व पै.प्रदीप ठाकुर (सांगली) यांच्यात लढत झाली. यामध्ये पै.प्रदीप ठाकुर (सांगली) यांनी एक लाख एकावण हजार रुपयांचे पारितोषिक पटकावले. यावर्षी आकर्षक म्हणजे महिला गट कुस्त्तीमध्ये पै.सोनाली मंडलिक (पुणे) व पै.वैदंती पवार यांची लढत बरोबरीची झाली.
दूसरा लढत पै. संजना डिसले (सांगली) व पै. धनश्री फंड (नगर) यांच्यात झाला .यामध्ये धनश्री फंड या विजयी झाल्या.यांनी पांच्याहत्तर हजार रुपयांचे परितोषिक पटकावले.यावेळी शंभर होऊन जास्त छोट्या-मोठ्या कुस्त्या लावण्यात आल्या होत्या. यावेळेस सलगर व मंगळवेढा तालुक्यातील असंख्य कुस्तीप्रेमी खेळाडू, भैरवनाथ शुगरचे कर्मचारी व पदाधिकारी, शिवसेनेचे पदाधिकारी व पंचक्रोशीतील सर्व नागरिक उपस्थित होते.