सोलापूरसह जिह्याला आज पुन्हा एकदा अवकाळी पावसाने तडाखा दिला आहे. गेल्या चार दिवसांपासून जिह्यात वाढत्या तापमानाबरोबरच अवकाळी पाऊस पडत आहे. काल सोलापूर, पंढरपूर, मोहोळ, अकलूज, दक्षिण सोलापूर, अक्कलकोट परिसराला अवकाळी पावसाने तडाखा दिला.दिवसभर उकाडय़ाने हैराण झालेल्या सोलापूरकरांना रात्री आठच्या सुमारास पडलेल्या अवकाळी पावसामुळे काहीसा दिलासा मिळाला.
ग्रामीण भागात सातच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली. या पावसामुळे सखल भागात पाणी साचले होते. दरम्यान, आंबा, द्राक्ष, कलिंगड, खरबूज या फळ उत्पादक शेतकऱयांबरोबरच मोठय़ा प्रमाणावर पिकांचे नुकसान झाले आहे. चार दिवसांपूर्वी अवघ्या अर्धा तासात झालेल्या पावसाने ओढय़ा-नाल्यांना पूर आला होता.