सांगोला तालुक्याचे आ. डॉ. बाबासाहेब देशमुख कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत झाले आक्रमक 

महाराष्ट्र जलसंपदा विभाग आयोजित कालवा सल्लागार समितीची बैठक पुणे येथे राज्याचे उपमुख्यमंत्री मा.ना. अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली व जलसंपदा मंत्री मा.ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. यावेळी जिल्हातील आमदार तसेच सर्व जलसंपदा विभागाचे अधिकारी वर्ग तसेच पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी कालवा सल्लागार समितीचा बैठक विविध कारणांमुळे चांगलीच गाजल्याचे दिसून आले. यावेळी बैठकीत सांगोला तालुक्याचे आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख हे सांगोला व पंढरपूर तालुक्यातील पाणीप्रश्नांवर आक्रमक झाल्याचे दिसून आले.

यावेळी आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी एन. आर.बी.सी च्या कॅनॉल चे अस्तरीकरणाचे काम लवकरात लवकर सुरू करण्यात यावे यासाठी चालू होणान्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या काळात विधानभवनात बैठक आयोजित करण्यात यावी आशी मागणी केली. याचबरोबर सांगोला व पंढरपूर तालुक्याचे हक्काचे पाणी वेळेत मिळावे. सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरू होत असून पाणी टंचाई तीव्र प्रमाणात जाणवायला सुरुवात झालेली आहे त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा, शेतीच्या पाण्याचा तसेच जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा गंभीर होवू शकतो त्यामुळे चालू उन्हाळी आवर्तन हे २ मार्च पासून देण्यात यावा.

त्याचबरोबर पाणी वापर संस्थेचे अनुदान परतावा अद्यापही दिला गेलेला नसून तो परतावा लवकरात लवकर देण्यात यावा आणि पाणी पट्टी ही आवाच्या सव्वा वाढविण्यात आली असल्याने शेतकऱ्यांना ती रक्कम भरने शक्य होणार नाही. पाणीपट्टीची रक्कम ही लवकरात लवकर कमी करून मायबाप शेतकरी वर्गाला दिलासा द्यावा, अशी मागणी त्यांनी शासनाकडे केली.