Bigg Boss OTT 3 : या दिवशी होणार……

मनोरंजन क्षेत्रातील सर्वात वादग्रस्त शो म्हणजे बिग बॉस ओटीटी 3 (Bigg Boss OTT 3) अनेक सेलेब्रिटींचा गोतावळा असलेल्या शोचे लाखो प्रेक्षक चाहते आहेत.शो बद्दल अपडेट घेण्यासाठी चाहते कायमच उत्सुक असतात. सलमान खान सूत्रसंचालन करत असलेल्या या शो बद्दल दररोज काही नवीन माहिती समोर येत असते.

आता शो बद्दल महत्त्वाचं अपडेट समोर आलं आहे.रिपोर्टनुसार, बिग बॉस ओटीटी 3 च्या प्रीमियरची तारीख लॉक करण्यात आली आहे. आयपीएल 2024 च्या फिनालेनंतर शोचा प्रीमियर होईल. 4-5 जून रोजी शोचा प्रीमियर होणार असल्याचे बोललं जात आहे. शोचा पहिला टीझर मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात रिलीज होऊ शकतं असंही म्हण्टल्या जातं आहे.

सलमान खानच्या बिग बॉस ओटीटी 3 मधील काही निश्चित स्पर्धकांची नावे देखील समोर आली आहेत आणि ते अदनान शेख आणि पंकित ठक्कर आहेत. याशिवाय टीव्ही शो ये रिश्ता क्या कहलाता है ची शिवांगी जोशी देखील या शोमध्ये दिसणार आहे. रिपोर्ट नुसार, शिवांगी ही शोची सर्वाधिक मानधन घेणारी स्पर्धक आहे.

बिग बॉसशी संबंधित सोशल मीडिया पेजद्वारे ही माहिती प्रसिद्ध केली जात आहे. निर्मात्यांनी अद्याप कोणतेही अधिकृत वक्तव्य समोर आलेलं नाही.बिग बॉस OTT 3 शी संबंधित सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सलमान खान लवकरच शोचा प्रोमो शूट करणार आहे. सिकंदर या चित्रपटाच्या शूटिंगपूर्वी तो या शोचा प्रोमो शूट करणार असल्याचं बोललं जात आहे.

15 मे नंतर सिकंदरचे शूटिंग सुरू करू शकतात. यावेळी बिग बॉस OTT 3 Jio सिनेमावर मोफत पाहू शकता येणार नाही आहे. यासाठी प्रेक्षकांना थोडे पैसै खर्च करावे लागणार आहे.