खासदार संजय पाटील यांना निवडणूक खर्चातील तफावतीबद्दल नोटीस…..

लोकसभा निवडणुकीतील महायुतीचे उमेदवार, खासदार संजय पाटील यांना निवडणूक खर्चातील तफावतीबद्दल जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी नोटीस बजावली आहे.खर्चाच्या नोंदवहीतील नोंदी आणि निवडणूक प्रशासनाला सादर केलेल्या खर्चाच्या तपशिलात दोन लाखांची तफावत असल्याचे नोटिसीत म्हटले आहे.

याबाबत ४८ तासांत खुलासा करण्याचे आदेश दिले आहेत.उमेदवारांनी दररोजच्या खर्चाच्या नोंदी एका स्वतंत्र नोंदवहीत ठेवायच्या आहेत. त्याचबरोबर दररोजचा खर्च जिल्हाधिकारी कार्यालयात सादर करायचा आहे. या दोहोंतील खर्चाची तपासणी प्रशासनामार्फत केली जाते. पाटील यांच्या खर्चाची प्रथम तपासणी प्रभारी निवडणूक निरीक्षकांच्या पथकाकडून २६ एप्रिल रोजी करण्यात आली. त्यामध्ये दोन लाखांची तफावत आढळली.