मी बाळासाहेबांचा कार्यकर्ता आहे. जो शब्द देतो तो पाळतोच. त्यामुळे वाकुर्डे बुद्रक योजना दोन वर्षांत पूर्ण करणार म्हणजे करणारच, आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. कामेरी (ता. वाळवा) येथे हातकणंगले मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते.
सी. बी. पाटील यांनी प्रास्ताविकात वाकुर्डे बुद्रुक योजनेचे काम लवकर मार्गी लावण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली.
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, भाजप संविधान बदलणार, अशा अफवा विरोधकांकडून पसरविल्या जात आहेत. मात्र ४ जून रोजी देशात विकासाचे नवे पर्व सुरू होणार आहे.
धैर्यशील माने म्हणाले सांगली पेठ रस्त्यासाठी माझ्या प्रयत्नातून ८०० कोटी रुपये मंजूर झाले, असेही त्यांनी सांगितले.सम्राट महाडीक म्हणाले, यापूर्वीच्या लोकप्रतिनिधींनी वाकुडें बुद्रुक योजनेचे गाजर दाखवून चार चार निवडणुका जिंकल्या.
पहिल्या टप्प्याचे काम निकृष्ट झाले आहे. युती शासनाच्या काळात १९९५ ला योजनेला मंजुरी मिळाली. आता आपल्याच सत्तेच्या काळात ती पूर्णत्वाला जावी. येथील लो