पुण्याच्या खराडीत बनावट कॉल सेंटर; दीडशे ते दोनशे पोलिस अधिकारी कर्मचाऱ्यांसह पोलिसांचा छापा

पुण्यातील खराडी परिसरात सुरू असलेल्या बनावट कॉल सेंटरवर पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने छापा टाकला आहे. दीडशे ते दोनशे पोलिस अधिकारी कर्मचाऱ्यांसह ही कारवाई करण्यात आली आहे. खराडी-मुंढवा बायपास रस्त्यावर प्राईड आयकॉन नावाची ही इमारत आहे. या इमारतीमधून हे बनावट कॉलसेंटरचालवले जात असल्याची माहिती आहे. यामध्ये कॉल सेंटरमध्ये काम करणाऱ्या अनेक तरुण-तरुणींना ताब्यात घेण्यात आलं आहे.

खराडी-मुंढवा बायपास रस्त्यावर प्राईड आयकॉन नावाच्या इमारत आहे. या इमारतीमधून हे बनावट कॉलसेंटरचालविले जात असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. दीडशे ते दोनशे पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांचा मोठा फौजफाटा या ठिकाणी दाखल झाला, या इमारतीमधून हे बनावट कॉलसेंटर चालवले जात होते. त्या अनुषंगाने पोलिस तपास करत आहेत. दरम्यान, या छाप्यानंतर सायबर फ्रॉडचे मोठे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.

पुण्यातील मॅग्नेटल बीपीएस अँड कन्सल्टन्सी एलएलपी हे कॉल सेंटर आहे. पोलिसांनी छाप्यामध्ये अनेक महत्त्वाचे साहित्य जप्त करण्यात आले आहे. अनेक लोकांची चौकशी सुरू आहे. तर पाच जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे. हे रॅकेट अमेरिकेतील लोकांना फसवायचे अशी माहिती समोर आली आहे. सायबरचा मोठा फ्रॉड होत होता अशी माहिती समोर आली आहे. या छाप्यात 41 मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. लॅपटॉपमधील अनेक महत्त्वाचा डाटा सायबर पोलिसांनी जप्त केला आहे. अमेरिकेमधील लोकांना फसून डिजिटल अटक करण्याच्या नावाखाली फसवायचे आणि पैसे मागायचे अशी माहिती समोर आली आहे. सायबर पोलीसांनी 61 लॅपटॉप जप्त केले आहेत. शंभर ते दीडशे लोक काम करत असल्याची माहिती आहे. सर्व गुजरातचे असून मुख्य आरोपी देखील गुजरातचा असल्याची माहिती आहे. खराडीतील गुजरातच्या लोकांचा कॉल सेंटर सायबर पोलिसांनी उध्वस्त केला आहे.