इचलकरंजीत नागरीकांतून नाराजीचा सूर……

वस्त्र नगरी म्हून ओळख असलेल्या इचलकरंजीत अलीकडच्या काही दिवसांपासून नाराजीचा सूर उमटत आहे. इचलकरंजी शहरातील सर्व भागातील गटारींची पूर्णपणे साफसफाई करण्यात येत नसून त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आलेले आहेत. पावसाळा तोंडावर आला तरी आरोग्य विभागाने याकडे गांभीर्याने पाहिलेले नाही, त्यामुळे नागरीकांतून नाराजीचा सुर उमटत आहे.

त्याचबरोबर महानगरपालिकेने आठ दिवसातून एक वेळ पाणी सोडणे व घरफळा वेळेवर न भरल्यास त्यावर २४ टक्के व्याजदर आकारणे त्याचप्रमाणे इचलकरंजी महानगरपालिकेमध्ये सफाई कर्मचारी किती आहेत व ते कोणत्या वेळी येतात व किती वाजता जातात याचा काहीही महानगरपालिकेकडे व्हिजिट बुक नसल्यामुळे ताळमेळ लागत नसून महानगरपालिका गटारी, पाणी, रस्ते व इतर सर्व समस्यांकडे जाणून- बुजून दुर्लक्ष करत आहे असे ह्यूमन राईट असोसिएशन दिल्ली मानवाधिकार संघटना कोल्हापूर जिल्हाध्यक्ष दत्ता मांजरे यांचे निदर्शनास आल्याने त्यांनी इचलकरंजी महानगरपालिकेचे सर्व खात्यांची चौकशी मानवाधिकार संघटनेकडून करणार असल्याचे सांगितले आहे.