राजस्थान रॉयल्सने संजू सॅमसनच्या नेतृत्वात 9 सामन्यांपैकी 8 सामन्यात विजय मिळवला आहे. राजस्थान 16 पॉइंट्ससह पहिल्य स्थानी आहे. राजस्थान प्लेऑफच्या शर्यतीत अव्वल स्थानी आहे.कोलकाता नाईट रायडर्सने 9 पैकी 6 सामने जिंकले आहेत. कोलकाताच्या नावावर 12 पॉइंट्स आहेत.
श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात केकेआरला 3 सामन्यात पराभूत व्हावं लागलं. तर लखनऊ सुपर जायंट्सने 10 पैकी 6 सामन्यात विजय मिळवला आहे.त्यानंतर पॉइंट्स टेबलमध्ये चौथ्या, पाचव्या आणि सहाव्या स्थानी ट्राफिक जॅम आहे. चेन्नई चौथ्या, सनरायजर्स हैदराबाद पाचव्या आणि दिल्ली कॅपिट्ल्स सहाव्या स्थानी आहे. तिन्ही संघांच्या नावावर प्रत्येकी 10 पॉइंट्स आहेत. हैदराबाद आणि दिल्लीच्या तुलनेत नेट रनरेट चांगला असल्याने चेन्नई चौथ्या स्थानी आहे.पंजाब किंग्स सातव्या आणि गुजरात टायटन्स आठव्या स्थानी आहे. दोन्ही संघांकडे प्रत्येकी 8-8 पॉइंट्स आहेत.
तर मुंबई इंडियन्सने 10 पैकी 3 सामने जिंकले आहेत. पलटण नवव्या स्थानी आहे. तर आरसीबी सर्वात शेवटी दहाव्या क्रमांकावर आहे.पॉइंट्स टेबलनुसार, राजस्थानचं प्लेऑफमध्ये पोहचणं निश्चित आहे. तसेच कोलकाता, लखनऊ, चेन्नई आणि हैदराबाद हे संघ प्रबळ दावेदार आहेत.