पीएम किसान योजनेंतर्गत देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांना आतापर्यंत १६ हप्त्यांचा लाभ मिळाला आहे. २८ फेब्रुवारी रोजी १६ व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर पाठवण्यात आली.मीडिया रिपोर्ट्सनुसार, मे महिन्याच्या अखेरीस किंवा जूनच्या सुरुवातीला देशातील शेतकऱ्यांना चांगली बातमी मिळू शकते. याचा अर्थ त्यांची प्रतीक्षा लवकरच संपुष्टात येऊ शकते. पीएम किसानचा पुढचा हप्ता कधी येईल याबद्दल कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.