सांगलीत लोकसभा (Sangli Loksabha) मतदानावेळी बोगस मतदान झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. या प्रकरणी कारवाईची मागणी करण्यात आली आहे. मतदानादिवशी सांगली शहरातील मालू हायस्कूलमध्ये मतदानासाठी आलेल्या चार महिलांच्या नावे बोगस मतदान झाल्याची तक्रार निदर्शनास आल्यानंतर एकच गोंधळ उडाला. त्यानंतर संबंधित महिलांनी जोरदार गोंधळ घातला.
यावेळी पोलीस आणि मतदारांमध्ये धक्काबुक्कीचा देखील प्रकार घडला. मतदानासाठी चार महिला मतदान करण्यासाठी मालू हायस्कूलमधील मतदान केंद्रावर आल्या होत्या. परंतु, यावेळी त्यांच्या नावावर यापूर्वीच मतदान झाल्याचे त्यांना सांगण्यात आले. परंतु, संबंधित महिलेनं आम्ही मतदान केलंच नाही, तर कोणी आमच्या नावावर मतदान केलं? असा जाब विचारला.
परंतु, तुमच्या नावावर मतदान झालं असून तुम्हाला आता मतदान करता येणार नाही असं केंद्राध्यक्षांनी सांगितल्यानंतर संबंधित महिलांनी गोंधळ घातला. मतदानावर ठाम असलेल्या महिलांमध्ये आणि पोलिसामध्ये झटापटीचा प्रकार घडला. आता याबाबत कारवाईची मागणी करण्यात आली आहे.