इस्लामपूर बालेकिल्ल्यात बाजी कोण मारणार ?

हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील इस्लामपूर-शिराळा एकनाथ शिंदे विधानसभा मतदारसंघावर माजी मंत्री जयंत पाटील यांचे वर्चस्व आहे. त्यांना शह देण्यासाठी वेळोवेळी दिग्गज नेत्यांनी हजेरी लावली. तरीही पाटील यांनी स्वतःचा गड आजही अबाधित ठेवला आहे. हातकणंगले लोकसभा निवडणुकीत मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जयंत पाटील यांच्याच बालेकिल्ल्यात नवीन पॅटर्न आणून उद्धसेनेचे उमेदवार सत्यजित पाटील यांच्यापुढे आव्हान उभे केले आहे.

त्यामुळे या मतदारसंघात कोण बाजी मारणार, याची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. उद्धव ठाकरे जयंत पाटील हातकणंगले
लोकसभा हातकणंगले मतदारसंघात एकूण २७ उमेदवार रणांगणात एकमेकांविरोधात उभे ठाकले होते. यापैकी शिवसेनेचे उमेदवार धैर्यशील माने, स्वाभिमानी मशाल, धनुष्यबाण की शिट्टीचा आवाज ? इस्लामपूर – शिराळा मतदारसंघात कमळाच्या ताकदीवर शिवसेनेने तीर सोडला आहे. तर तुतारीच्या गर्जनेने मशाल फुलविण्याचा प्रयत्न झाला आहे. तिसरे उमेदवार स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांनीही हातकणंगलेत शिट्टी घुमणार असल्याचा दावा केला आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कल्पनेतून देशाचा विकास होत आहे.

इस्लामपूर, शिराळ्यात विकासाची गंगा शिवसेनेने आणली आहे. त्यामुळेच आमचे उमेदवार धैर्यशील माने मोठ्या मताधिक्याने निवडून येतील. आनंदराव पवार, जिल्हाप्रमुख शिंदेसेना शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी आणि उद्धवसेनेचे सत्यजित पाटील यांच्यामधील लढत चर्चेची ठरली. मतदान जवळजवळ ७० टक्क्यांच्या घरात जाऊन पोहोचल्याने प्रत्येक महाविकास आघाडीतील सर्वांनीच गट-तट बाजूला ठेवून एकदिलाने निवडणुकीत सहभाग नोंदवला आहे. त्याचेच फळ म्हणून उमेदवार सत्यजित पाटील लाखाच्या फरकाने निवडून येतील. अभिजित पाटील, जिल्हाध्यक्ष उद्भवसेना उमेदवार आपापल्या परीने आपली ताकद आजमावत आहे. यामध्ये तीनही उमेदवारांकडून आपणच निवडून येणार, असा दावा केला जातोय. निकालासाठी ४ जूनपर्यंत प्रतीक्षा करावी लागेल.