खानापुरात महात्मा बसवेश्वर यांना अभिवादन

खानापूर महात्मा बसवेश्वर यांची जयंती खानापूरमध्ये साजरी करण्यात आली. जयंतीनिमित्त महात्मा बसवेश्वर यांना अभिवादन करण्यात आले. खानापूर येथील हनुमान मंदिरात महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी हर्षवर्धन माने, रणधीर टिंगरे, दीपक टिंगरे, कैलास टिंगरे, दत्तात्रय माळी, गिरीश कोरे, संतोष टिंगरे, किरण पाटील उपस्थित होते.