राज्यभरात पुढील चार दिवस अवकाळी पावसाचा जोर…..

राज्यात पुढील चार दिवस अवकाळी पाऊस आणि गारपिटीचे असणार आहेत. हवामान विभागाने मध्य विदर्भाला अवकाळीसह गारपिटीचा आणि उर्वरित भागात अवकाळी पावसासाठी पिवळा आणि नारंगी इशारा दिला आहे.रविवारी पुणे, सातारा आणि नांदेडला अवकाळीसाठी, तर अवकाळी आणि गारपिटीसाठी अकोला, अमरावती, नागपूर, वाशिमला ऑरेंज अलर्ट दिला आहे. सोमवारी अवकाळीसाठी कोल्हापूर, सांगलीला, तर अवकाळी आणि गारपिटीसाठी अमरावती, वाशिम, यवतमाळ आणि वर्ध्याला इशारा दिला आहे.

इशारा दिलेल्या ठिकाणी पाऊस आणि गारपिटीचा जोर जास्त राहणार आहे. संपूर्ण मराठवाडा, विदर्भ, खान्देश, तसेच दक्षिण महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर आणि उत्तर महाराष्ट्रातील नाशिक आणि नगर यांसह २९ जिल्ह्यांत पुढील आठवडाभर म्हणजे शनिवार, १८ मेपर्यंत ढगाळ वातावरणासह तुरळक ठिकाणी ढगांचा गडगडाट, विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे.अशी माहिती हवामान विभागाचे निवृत्त शास्त्रज्ञ माणिकराव खुळे यांनी दिली.