महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 ची परीक्षा पदांसाठीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. तब्बल 524 जागांवर ही भरती होणार आहे.यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवार MPSC च्या वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज सादर करण्याचा कालावधी 24 मे, 2024 रोजी 23:59 पर्यंत आहे.
रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता
1) राज्य सेवा गट-अ व गट-ब (सामान्य प्रशासन विभाग) – 431 जागा
शैक्षणिक पात्रता : पदवीधर किंवा 55% गुणांसह B.Com +CA/ICWA+MBA किंवा सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी.
2) महाराष्ट्र वन सेवा, गट-अ व गट-ब (महसूल व वन विभाग) – 48 जागा
शैक्षणिक पात्रता : (i) वनस्पतीशास्त्र/रसायनशास्त्र/वनशास्त्र/भूशास्त्र/गणित/भौतिकशास्त्र/सांख्यिकी/प्राणीशास्त्र/उद्यानविद्या/कृषी पदवी किंवा इंजिनिअरिंग पदवी किंवा समतुल्य.
3) महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा गट-अ व गट-ब (मृद व जलसंधारण विभाग) – 45 जागा
शैक्षणिक पात्रता : सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी.
ऑनलाईन पद्धतीने विहित परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक 24 मे, 2024 रोजी पर्यंत
भारतीय स्टेट बॅंकेमध्ये चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरण्यासाठी चलनाची प्रत घेण्याचा दिनांक 26 मे, 2024 पर्यंत आहे.
चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दि 27 मे, 2024 रोजी आहे.
वयाची अट
01 एप्रिल 2024 रोजी 18/19 ते 38 वर्षे [मागासवर्गीय/आ.दु.घ./अनाथ: 05 वर्षे सूट]
पूर्व परीक्षा केंद्र: महाराष्ट्रातील 37 केंद्र.