आटपाडी बाजार समितीकडून यंदा १८ ते २२ मे या कालावधीत आंबा महोत्सव आयोजीत केला आहे. सर्वसामान्यांना दर्जेदार आंबा उपलब्ध व्हावा आणि शेतक-यांना देखील बाजारपेठ उपलब्ध व्हावी या हेतूने हा उपक्रम राबविला जात आहे. शेतक-या आंबा महोत्सवात आंबा विक्रीसाठी आणावा असे आवाहन कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संतोष पुजारी यांनी केले आहे. सदर आंबा महोत्सव पाच दिवस सुरू राहणार आहे. दि. १८ ते २२ मे या दरम्यान हा महोत्सव होणार आहे. बाजार
समितीमार्फत स्टॉल, पिण्याचे पाणी, विजेसह अन्य सुविधा मोफत उलब्ध करून देण्यात आल्या आहे.
आटपाडी तालुक्यातील सर्वांनी या आंबा महोत्सवाचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे. आटपाडी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये डाळींब सौदे बाजार सुरू आहे. सांगली सातारा सोलापूरसह राज्याच्या अनेक भागातून डाळींब विक्रीसाठी आटपाडीत येतात. देशातील विविध राज्यात आटपाडी बाजार समि तीतून सौदे झालेले डाळींब पाठवली जातात. बाजार समिती सफरचंद, ड्रॅगन फ्रुट, चिकू, पेरू या फळांचे देखील सौदे होतात. बाजार समितीने आणि कृषी पणन मंडळाने आंबा महोत्सव आयोजीत केला आहे.