यावर्षी प्रचंड उकाडा आहे त्यामुळे सर्वसामान्य जनता खूपच त्रासलेली आहे. उकाड्यामुळे अनेकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. जरी अनेक भागात पावसाने हजेरी लावली असली तरी अजूनही उकाडा खूपच आहे. त्यामुळे गावागावत नदीवर पोहणाऱ्यांची संख्या जास्त पहायला मिळत आहे. वातावरणात प्रचंड उष्मा आहे. घामाच्या धारा वाहत आहेत. त्यामुळे संध्याकाळचे साडेचार वाजले तरी नदीत डुबक्या मारताना वाळव्यात मुले दिसत आहेत. साडेचार वाजले तरी नदीत डुबक्या मारायला गर्दी उसळली आहे. लहान मुलांपासून तर वयोवृद्ध व्यक्ती नदीच्या पात्रात पोहत बसले आहेत. पाण्यातून बाहेर यायला कोणी तयार नाही. क ष्णा नदीत पाणी भरपूर आहे. नागठाणे बंधारा यामुळे येथे पाणी भरपूर आहे.