महाविकास आघाडीत सोलापूर शहर मध्य मतदारसंघाच्या जागेवरून धुसफूस सुरू आहे. मित्रपक्ष मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे माजी आमदार नरसय्या आडम मास्तर यांनी सोलापूर शहर मध्य मतदारसंघावर दावा केला आहे. तो काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी फेटाळून लावला आहे. शहर मध्य मतदारसंघातून काँग्रेस पक्षाचा एकनिष्ठ कार्यकर्ता विधानसभेची निवडणूक लढवेल, असे त्यांनी आज जाहीर केले, त्यामुळे उद्योजक शिखर पहाडिया यांच्या उमेदवारीच्या चर्चेवर त्यांनी पडदा टाकला आहे.
महाविकास आघाडीतील जागावाटप जाहीर होण्यापूर्वीच प्रणिती शिंदे यांनी सोलापूर शहर मध्य मतदसरसंघावर दावा ठोकला आहे. काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ असलेला कार्यकर्ता सोलापूर शहर मध्य मतदारसंघाचा उमेदवार म्हणून विधानसभेची निवडणूक लढवेल, असे खासदार प्रणिती शिंदे यांनी जाहीर करून टाकले, त्यामुळे महाविकास आघाडीतील वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे.