लोकसभा निवडणुकीच्या पाच टप्प्यातील मतदान 20 मे रोजी पार पडणार आहे. यापूर्वी महाराष्ट्रात चार टप्प्यात मतदान पूर्ण झाला आहे. या लोकसभा (Loksabha) निवडणुकीत सर्वात चर्चेतील असलेला सोलापूर लोकसभा (Solapur Loksabha ) मतदारसंघात भाजप (BJP) विरुद्ध काँग्रेस (Congress ) अशी लढत होते.सोलापूर लोकसभा मतदारसंघात तिसऱ्या टप्प्यात मतदान पार पडले होते.
मात्र आता या मतदारसंघातून कोण निवडून येणार यावर मनसे (MNS) आणि शरद पवार (Sharad Pawar) गटाच्या कार्यकर्त्यांकडून पैज (Bet) लावण्यात आली आहे. आता या पैज मध्ये कोण जिंकणार हे 4 जून रोजी होणाऱ्या मतमोजणी नंतरच स्पष्ट होणार आहे. लोकसभा निवडणुकांचे मतदान आता अंतिम टप्प्यात आले आहे. 4 जून रोजी लोकसभा निवडणुकांचे निकाल समोर येणार आहेत.
मात्र त्याआधीच निकालाचे अंदार्ज वर्तवले जात आहेत, अनेक उमेदवारांच्या विजयाचे बॅनर्सही झळकू लागलेत.सोलापुरमध्ये भाजपचे राम सातपुते जिंकणार असा दावा करत मनसेचे लोकसभा अध्यक्ष प्रशांत इंगळे यांनी १ लाख १ हजार रुपयांची पैज लावली आहे. तर काँग्रेसच्या प्रणिती शिंदे जिंकणार असा दावा करत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे युवक प्रदेश उपाध्यक्ष प्रशांत बाबर यांनी १ लाख १ हजाराच्या पैजेचा विडा उचलला आहे. त्यामुळे ही एका लाखाची पैज कोण मारणार? याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे.